१)
नेहमी आपलाच जय करू नये,
कधी इतरांनाही वाव द्यावा,
आणि खऱ्या जीवनाचा आनंद
आपणही लुटावा.
२)
जीवन हे एक नाटक असतं,
त्यात देव हा निर्माता आणि
आपण कलाकार असतो,
फरक इतकाच की,
जीवन हा खरा अभिनय असतो,
आणि नाटक हा नकली अभिनय असतो.
३)
जगाकडे पाहिलं की,
जीवन निरर्थक वाटतं,
पण तुझ्याकडे पाहिलं की,
जीवनातला खरा राम गवसतो.
४)
जगात देव नाही
असं कोण म्हणतं,
अरे स्वतःच्या मनात जरा, डोकावून पहा,
त्या मनात देवाचीच वस्ती असेल.
५)
इंद्रधनुचे सात रंग,
जीवनाचे अनेक रंग,
इंद्रधनु क्षणात पलटे,
जीवनही क्षणात मिटे.

No comments:
Post a Comment